जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावामध्ये मृद व जलसंधारणाची कामे करणे, जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल तेथे पाणलोट विकासाची कामे करणे, जलसाक्षरता द्वारे गावातील पाण्याची उपलब्धता व कार्यक्षम वापर या करीता प्रयत्न करणे, मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे व उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याकरिता दिनांक ०३ जानेवारी, २०२३ अन्वये “जलयुक्त शिवार अभियान २.०” राबविण्यात येत आहे.

योजनेचा मुख्य उद्देश:-

१) पावसाचे पाणी अडवून भूजल पातळीत वाढ करणे.
२) विकेंद्रित जलसाठे निर्माण करणे.
३) संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे.
४) जलस्रोतांची देखभाल दुरुस्ती करून साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे.

  • योजनेसाठी अंमलबजावणी करणारी यंत्रणा जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग (राज्यस्तर).
  • सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध स्तरावर समित्या स्थापन करण्यात आले असून जिल्हा स्तरावरजिल्हा जलसंधारण अधिकारी व तालुका स्तरावर उपविभागीय जलसंधारण अधिकारी सदस्य सचिवआहेत.
  • जलयुक्तशिवार अभियान २.० योजनेतर्गत पाणलोट घटक महत्वाचाअसून माथा ते पायथा या तत्त्वावर क्षेत्र उपचार कामे (Area Treatment Works), नाला उपचाराची कामे (Drainage Treatment Works), सिंचन क्षमता पुनःस्थापित करण्यासाठी दुरुस्ती/नूतनीकरणाची कामे इ. कामे हाती घेण्यात येतात.
  • या प्रादेशिक कार्यालयातील विभागीय कार्यालयांतर्गत जिल्हा जलसंधारण अधिकारी कळवा-ठाणे कार्यालयाकडून ठाणे व पालघर जिल्ह्यात, जिल्हा जलसंधारण अधिकारी रायगड कार्यालयाकडून रायगड जिल्ह्यात आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी रत्नागिरी कार्यालयाकडून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.० योजना राबविण्यात येत आहे.
  • जलयुक्तशिवारअभियान२.०योजनेतर्गतठाणेजिल्ह्यातील१५२, पालघर जिल्ह्यातील १९५, रायगड जिल्हातील २३८, रत्नागिरी जिल्ह्यातील २३३ व सिंधुदुर्ग जिल्हातील ११९ अशा कोकण विभागांतर्गत एकूण ९३७ गावांची निवड करण्यात आलेली असून एकूण ९३७ गावांचा गाव आराखडा मंजूर झालेला आहे.

जलयुक्त शिवार अभियान २.०

जिल्हानिहाय तपशील

अ.क्र. जिल्‍हा कामांची एकूण संख्या निर्माण होणारी संरक्षीत सिंचन क्षमता (हे.) (Projected) निर्माण होणारी साठवण क्षमता स.घ.मी./ TCM
ठाणे २४५० ८३४६.८३ २४५४.८
रायगड २२७८ २०८८.३ ३३५२.३४
रत्नागिरी २२८४ १४२८.४८ ३४८८.५२
पालघर ३७२५ ८१७५.९२ ३२२५.४
सिंधुदुर्ग १०९२ १७१.९ ३१४.३५
कोकण विभाग ११८२९ २०२११.४३ १२८३५.४१

 

अ.क्र. तारीख शीर्षक डाउनलोड
०३ जानेवारी, २०२३ जलयुक्त शिवार अभियान २.० राबविणेबाबत. डाउनलोड
०५ जानेवारी, २०२३ जलयुक्त शिवार अभियान २.० राबविणेबाबत. डाउनलोड