- महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त धरणे, जलसाठे असलेले राज्य असून या धरणांमध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट होत आहे.
- या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ देखील होणार आहे.
- या योजनेमुळे जलसाठ्यांची पुनर्स्थापना होणार असून त्यामुळे जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत शाश्वत स्वरुपाची वाढ होईल. यामुळे शेतीकरिता पाणी उपलब्ध होण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील काही प्रमाणात निकाली निघेल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे किंवा पिकाचा मोबदला म्हणून रक्कम अदा करणे यामध्ये देखील कपात होईल.
- जनावरांसाठी चारा व पाण्याच्या पुरेशा उपलब्धतेमुळे त्यावरील होणारा खर्च देखील कमी होईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खताच्या खर्चात सुमारे ५०% पर्यंत घट होणार असून दुभत्या जनावरांपासून होणाऱ्या उत्पन्नात वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून कर्जाची परतफेड करण्यास मदत होणार आहे.
- मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय दि. २०/०४/२०२३ अन्वये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राज्यात कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
उद्देश:-
१) साठवण क्षमता पुनस्र्थापित करणे.
२) उपसलेला सुपीक गाळ शेतात पसरवून कृषी उत्पनात वाढ.
- अंमलबजावणी करणारी यंत्रणा जिल्हाजलसंधारणअधिकारी, मृद व जलसंधारण विभाग(राज्यस्तर)
- सनियंत्रणः- कामांचे मूल्यमापन अवनीॲपमार्फत.
- ६०० हेक्टरपेक्षा कमी लाभ क्षेत्र असलेल्या व १० वर्षापेक्षा जुन्या जलसाठ्यांना प्राध्यान्यक्रम.
- अत्यअल्पभूधारक (१हेक्टरपर्यंत) वलहानभूधारक (१ते२हेक्टर), विधवा, अपंग व आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांना अनुदान.
- गाळ वाहून नेण्याचा दरः३५.७५/प्रती घमी. (प्रती एकर १५०००रु.)
- अनुदान :- २.५एकर पर्यंत मर्यादित (कमाल रु.३७५००/-).
- सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध स्तरावर समित्या स्थापन करण्यात आले असून जिल्हास्तरावरील समितीचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून जिल्हाजलसंधारण अधिकारी हे सदस्य सचिव व तालुका स्तरावरील समितीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी हे अध्यक्ष व शाखा अभियंता हे सदस्य सचिवआहेत.
अधिक माहितीसाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा :-
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा :
श्री. धनंजय साहुत्रे, जिल्हा जलसंधारण अधिकारी रत्नागिरी
०२३५२-२२९१३४/ ९५५२९०५७७३
ठाणे व पालघर जिल्हा :
श्री. फरीद खान, जिल्हा जलसंधारण अधिकारी ठाणे – ८७९३५८२८६६
रायगड जिल्हा :
श्री. कविजीत पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी रायगड – ९९८८९६५५५५
अ.क्र. | तारीख | शीर्षक | डाउनलोड |
---|---|---|---|
१ | २० एप्रिल, २०२३ | गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविणेबाबत. | डाउनलोड |
२ | २४ एप्रिल, २०२३ | गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविणेबाबत. | डाउनलोड |
३ | ०५ फेब्रुवारी, २०२४ | गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविणेबाबत. | डाउनलोड |