लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणना व जलसाठ्याची २ री प्रगणना
• केंद्र शासनाकडून राष्ट्रव्यापी लघुसिंचन योजनांची (०-२००० हेक्टर सिंचन क्षमता) ७ वी प्रगणना आणि जलसाठ्यांची २ री प्रगणना करण्यात येत आहे. लघुसिंचन योजनांची १ ली प्रगणना १९८६-८७ साली राबविण्यात आली असून आता पर्यंत ६ वेळा लघुसिंचन योजनांची प्रगणनाराबविण्यात आली आहे. २०१७-१८ साली ६ व्या लघुसिंचन योजनांच्या प्रगणनेबरोबरच जलसाठ्याची १ली प्रगणना राबविण्यात आली आहे.
• सदर प्रगणनेमध्ये खालील पूर्ण झालेल्या योजनांचा समावेश होणार आहे.
१. भूपृष्ठाखालील जलसाठ्याच्या वापरासाठी योजनाः साध्या विहिरी, उथळ, मध्यम व खोल कुपनलिका.
२. भूपृष्ठावरील जलसाठ्याच्या वापरासाठी योजना:- ०-२००० हेक्टर सिंचन क्षमतेचे लघु सिंचन योजना, धरण, कालवे, बंधारे, विमोचक, बंद नलिका वितरण प्रणाली इत्यादिमुळे केले जाणारे प्रवाही सिंचन आणि नदी, नाले, बंधारे, जलाशय इत्यादिवरील उपसा सिंचन योजना.
३. नागरी आणि ग्रामीण भागातील जलसाठे (वॉटर बॉडीज) व २००० हेक्टर वरील सिंचन क्षमतेचे मोठे व मध्यम प्रकल्प आणि उपसा सिंचन योजना इत्यादि.
४. कृषि व मृदसंधारण विभागाकडील सिमेंट बंधारे, शेततळे, सिंचन विहीरी इत्यादि.
५. भूजल सर्वेक्षण यंत्रणे संबंधित कुपनलिका इत्यादि.
लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणना – ग्रामीण भागात (गावांमध्ये) व जलसाठ्याची २ री प्रगणना शहरी (वॉर्ड) व ग्रामीण भागात (गावांमध्ये) राबविण्यात येणार आहे.लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणनाव जलसाठ्याची २ री प्रगणना मध्ये मुंबई व मुंबई उपनगर या नवीन दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणना व जलसाठ्यांची २ री प्रगणना कार्यक्रमासाठी गणना अधिकारी म्हणून आयुक्त, मृद व जलसंधारण विभाग (महाराष्ट्र राज्य), छत्रपती संभाजीनगर हे कार्य पाहणार असून त्यांचे पदनाम ‘राज्य प्रगणना आयुक्त’ असे राहील. सदर प्रगणना कार्यक्रमाची अंमलबजावणी परिपूर्ण व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून अप्पर आयुक्त, मृद व जलसंधारण विभाग (म.रा.), छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणनाव जलसाठ्याची २ री प्रगणनेची माहिती संकलनासाठी मोबाईल ॲप्लिकेशन आणि माहिती व्यवस्थापन व पडताळणीसाठी वेब पोर्टलचा वापर केला जाणर आहे.
• लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणनाव जलसाठ्याची २ री प्रगणनेच्या प्रभावी अंमलबजावणी, सनियंत्रण व समन्वयासाठी मृद व जलसंधारण विभाग शा.नि. २८/११/२०२४ अन्वये राज्यस्तरीय सुकाणु व तांत्रिक समिती, महसुल विभाग स्तरीय, जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय सनियंत्रण समिती अशा विविध स्तरांवरील समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
• कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये लघुसिंचन योजनांची 7 वी प्रगणनाव जलसाठ्याची २ री प्रगणनेच्या अंमलबजावणी करिता खालीलप्रमाणे सदस्य सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१. ठाणे, पालघर व मुंबई शहर या तीन जिल्ह्यांमध्ये प्रगणनेच्या अंमलबजावणीकरिता जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग,कळवा-ठाणे हे सदस्य सचिव तथा नोडल अधिकारी आहेत.
२. रायगड व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये प्रगणनेच्या अंमलबजावणीकरिता जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग,रायगड हे सदस्य सचिव तथा नोडल अधिकारी आहेत.
३. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये प्रगणनेच्या अंमलबजावणीकरिता जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग, रत्नागिरी हे सदस्य सचिव तथा नोडल अधिकारी आहेत.