जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावामध्ये मृद व जलसंधारणाची कामे करणे, जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल तेथे पाणलोट विकासाची कामे करणे, जलसाक्षरता द्वारे गावातील पाण्याची उपलब्धता व कार्यक्षम वापर या करीता प्रयत्न करणे, मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे व उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याकरिता दिनांक ०३ जानेवारी, २०२३ अन्वये “जलयुक्त शिवार अभियान २.०” राबविण्यात येत आहे.
योजनेचा मुख्य उद्देश:-
१) पावसाचे पाणी अडवून भूजल पातळीत वाढ करणे.
२) विकेंद्रित जलसाठे निर्माण करणे.
३) संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे.
४) जलस्रोतांची देखभाल दुरुस्ती करून साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे.
- योजनेसाठी अंमलबजावणी करणारी यंत्रणा जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग (राज्यस्तर).
- सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध स्तरावर समित्या स्थापन करण्यात आले असून जिल्हा स्तरावरजिल्हा जलसंधारण अधिकारी व तालुका स्तरावर उपविभागीय जलसंधारण अधिकारी सदस्य सचिवआहेत.
- जलयुक्तशिवार अभियान २.० योजनेतर्गत पाणलोट घटक महत्वाचाअसून माथा ते पायथा या तत्त्वावर क्षेत्र उपचार कामे (Area Treatment Works), नाला उपचाराची कामे (Drainage Treatment Works), सिंचन क्षमता पुनःस्थापित करण्यासाठी दुरुस्ती/नूतनीकरणाची कामे इ. कामे हाती घेण्यात येतात.
- या प्रादेशिक कार्यालयातील विभागीय कार्यालयांतर्गत जिल्हा जलसंधारण अधिकारी कळवा-ठाणे कार्यालयाकडून ठाणे व पालघर जिल्ह्यात, जिल्हा जलसंधारण अधिकारी रायगड कार्यालयाकडून रायगड जिल्ह्यात आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी रत्नागिरी कार्यालयाकडून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.० योजना राबविण्यात येत आहे.
- जलयुक्तशिवारअभियान२.०योजनेतर्गतठाणेजिल्ह्यातील१५२, पालघर जिल्ह्यातील १९५, रायगड जिल्हातील २३८, रत्नागिरी जिल्ह्यातील २३३ व सिंधुदुर्ग जिल्हातील ११९ अशा कोकण विभागांतर्गत एकूण ९३७ गावांची निवड करण्यात आलेली असून एकूण ९३७ गावांचा गाव आराखडा मंजूर झालेला आहे.
जलयुक्त शिवार अभियान २.०
अ.क्र. | जिल्हा | कामांची एकूण संख्या | निर्माण होणारी संरक्षीत सिंचन क्षमता (हे.) (Projected) | निर्माण होणारी साठवण क्षमता स.घ.मी./ TCM |
---|---|---|---|---|
१ | ठाणे | २४५० | ८३४६.८३ | २४५४.८ |
२ | रायगड | २२७८ | २०८८.३ | ३३५२.३४ |
३ | रत्नागिरी | २२८४ | १४२८.४८ | ३४८८.५२ |
४ | पालघर | ३७२५ | ८१७५.९२ | ३२२५.४ |
५ | सिंधुदुर्ग | १०९२ | १७१.९ | ३१४.३५ |
कोकण विभाग | ११८२९ | २०२११.४३ | १२८३५.४१ |
अ.क्र. | तारीख | शीर्षक | डाउनलोड |
---|---|---|---|
१ | ०३ जानेवारी, २०२३ | जलयुक्त शिवार अभियान २.० राबविणेबाबत. | डाउनलोड |
२ | ०५ जानेवारी, २०२३ | जलयुक्त शिवार अभियान २.० राबविणेबाबत. | डाउनलोड |