पाणलोट रथ यात्रा
- माती आणि पाणी या दोन महत्वाच्या घटकांशी निगडीत असलेला मृद व जलसंधारण विभागशेती व सिंचन या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.
- केंद्र पुरस्कृत 'प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.०' योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
- राज्यात पाणलोट संदर्भात जनजागृती करण्यासाठी जानेवारी ते मार्च असे तीन महिने 'पाणलोट रथयात्रा'काढण्यात येणार आहे. राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाची ही विशेष मोहीम असून'प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.०’ या योजनेच्या १४० प्रकल्प क्षेत्रातील ३० जिल्ह्यांमध्येही रथयात्रा नेली जाणार आहे. यात कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा देखील समावेश आहे.
- पाणलोट यात्रेचे आयोजन व्यापक प्रमाणात करण्यात येणार असून त्याच्या कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जिल्हा पातळीवर मा.जिल्हाधिकारी यांची अध्यक्ष तथा नियंत्रक व जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची सदस्य सचिव तथा समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तालुका पातळीवर उपविभागीय अधिकारी (महसूल) यांची अध्यक्ष तथा नियंत्रक व उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांची सदस्य सचिव तथा समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
- पाणलोट रथयात्रेस १५ ते २० जानेवारी दरम्यान प्रारंभ होईल. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ या तीन प्रदेशांत तीन रथ प्रचार करणार आहे.
- पाणलोट रथयात्रा कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यांतून जाणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८ गावे, रत्नागिरी जिल्ह्यातील १८ गावे, रायगड जिल्ह्यातील २० गावे, पालघर जिल्ह्यातील १६ गावे व ठाणे जिल्ह्यातील २ गावांमध्येही रथयात्रा नेली जाणार आहे.
- वृक्ष लागवड करणे, जुन्या पाणलोट कामांची दुरुस्ती, भूमी जलसंवाद, श्रमदान असे उपक्रम रथयात्रेत होणार आहेत. यात्रेदरम्यान पाणलोट योध्यांची तसेच धरिणीताई यांची पाणलोट जनजागृती करण्यासाठी नेमणूक करण्यात येणार आहे. या मोहिमेतील सहभागांसाठी युवकांची 'माय भारत'पोर्टलमार्फत नोंदणी करण्यात येणार असून हाती माती घेऊन मृद व जलसंरक्षणाची गावकऱ्यांना शपथ दिली जाईल.यात्रेत फिरते मोटार चित्रपटगृह असणार असून गावकऱ्यांना आभासी पाणलोट सहलीचा अनुभव घेता येणार आहे. यात्रेदरम्यान माती व पाणी परीक्षण केले जाईल.
- रथयात्रेद्वारे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना जवळच्या धरण व तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.जलसंवर्धनाच्या जगजागृतीसाठी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध आदी स्पर्धांचे आयोजनही केले जाणार आहे.
पाणलोट रथ यात्रा - सिंधुदुर्ग
पाणलोट रथ यात्रा - पालघर
पाणलोट रथ यात्रा - ठाणे
पाणलोट रथयात्रा, रायगड