प्रस्तावना

महाराष्ट्रात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीवर कायम स्वरूपी उपाय योजना करण्याच्या उद्देशाने जलसंधारणाच्या योजना राबविणेसाठी शासनाने ० ते २५० (हे.) पर्यंत सिंचन क्षमता असलेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पाचे बांधकाम व देखभाल व व्यवस्थानाचे काम ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत करण्याचा निर्णय शासन पाटबंधारे विभाग संकीर्ण १०९२ (२८३/९२) आ (क्षेप्र) दिं. ३० सप्टेंबर १९९२ अन्वये घेण्यात आला. शासन निर्णय दिनांक ३१/०५/२०१७ अन्वये मृद व जलसंधारण विभागाची नव्याने स्थापना करण्यात आलेली आहे. मृद व जलसंधारण विभागाचे कार्यक्षेत्र २५० हे. वरून ६०० हेक्टर इतके करण्यात आलेले आहे.

त्यानुसार या प्रादेशिक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात संपूर्ण कोकण विभागाचा (मुंबई व मुंबई उपनगर वगळून) समावेश असून ० ते ६०० हे. सिंचन क्षमता असलेल्या योजनांची कामे मृद व जलसंधारण राज्यस्तर यंत्रणेमार्फत राबविण्यात येतात.तसेच, ० ते १००हे. सिंचन क्षमता असलेल्या योजनांची कामे जिल्हापरिषदेमार्फत राबविण्यात येतात. प्रादेशिक जलसंधारण अधिकारीयांच्यावर त्यांच्या अधिपत्याखालील जिल्हा जलसंधारण कार्यालयावर नियंत्रण ठेवण्याचे व जलसंधारणाच्या सर्व कामांसाठी प्रादेशिक स्तरावरील अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.मृद व जलसंधारण राज्यस्तर यंत्रणा व जिल्हा परिषद यंत्रणा यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्याचे काम प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येते. या मंडळांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजना, पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, वळवणी बंधारे, काँक्रीट बंधारे, पक्के बंधारे, भूमीगत बंधारे, साठवण बंधारे व गांव तलाव इं. कामे करण्यात येतात. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.०, जलयुक्त शिवार अभियान २.० व गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार यासारख्या शासनाच्या महत्वकांक्षी योजना राबविण्यात येतात.

अ.क्र. विभागाचे नांव मुख्यालय कार्यक्षेत्र
प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे ठाणे संपूर्ण कोकण विभाग (मुंबई व मुंबई उपनगर वगळून)
जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे ठाणे ठाणे व पालघर जिल्हा
जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग,रायगड रायगड रायगड जिल्हा
जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग,रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा
जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, (ल. पा.), ठाणे ठाणे ठाणे जिल्हा
जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, (ल. पा.), पालघर पालघर पालघर जिल्हा
जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, (ल. पा.), सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद,
रत्नागिरी अंतर्गत उपविभागीय जलसंधारण अधिकारी ल.पा. उपविभाग,
जिल्हा परिषद, मंडणगड
रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद,
रायगड अंतर्गत उपविभागीय जलसंधारण अधिकारी ल.पा. उपविभाग,
जिल्हा परिषद, कर्जत
रायगड-अलिबाग रायगड जिल्हा

अ) जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे

या विभागाचे कार्यक्षेत्र ठाणे व पालघर जिल्हा असून विभागाचे कार्यक्षेत्रात ४ उपविभाग आहेत. ठाणे जिल्ह्यात २ उपविभाग अनुक्रमे बदलापूर व शहापूर आणि पालघर जिल्ह्यात २ उपविभाग अनुक्रमे पालघर व सूर्यानगर येथे कार्यरत आहेत.

ब) जिल्हाजिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, रायगड
विभागाचे कार्यक्षेत्र रायगड जिल्हा असून विभागाचे कार्यक्षेत्रात ४ उपविभाग आहेत.रायगड जिल्ह्यात ४ उपविभाग माणगाव, कोलाड, कर्जत व अलिबाग येथे कार्यरत आहेत.

क) जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, रत्नागिरी
विभागाचे कार्यक्षेत्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा असून विभागाचे कार्यक्षेत्रात ६ उपविभाग आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ३ उपविभाग दापोली, चिपळूण वलांजा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ उपविभाग फोंडाघाट, सावंतवाडी व आंबडपाल येथे कार्यरत आहेत.