प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.०

  • केंद्रीय भूसंसाधन विभाग, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक २.० ही योजना राज्यात राबविण्यासाठी दि.३० डिसेंबर २०२१ रोजी मार्गदर्शक सूचनानुसार निर्गमित केल्या आहेत. या योजनेकरिता केंद्र व राज्य शासनाच्या निधीचे प्रमाण ६०:४० आहे.
  • प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० राज्यात २०२१-२२ पासून राबविली जात आहे.

योजनेचा मुख्य उद्देश:-

१) राज्यातील पडीक जमिनीचा विकास करून ग्रामीण जनतेला रोजगार, उपजिवीका, आर्थिकस्तर उंचावणे व त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
२) मृद संधारणाची कामे करून जमिनीची उत्पादकता वाढविणे.

  • योजनेसाठी अंमलबजावणी करणारी यंत्रणा :- जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग (राज्यस्तर).
  • सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध स्तरावर समित्या स्थापन करण्यात आले असून जिल्हा स्तरावर जिल्हा जलसंधारण अधिकारी व तालुका स्तरावर उपविभागीय जलसंधारण अधिकारी सदस्य सचिव आहेत.
  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० योजनेतर्गत पाणलोट घटक महत्वाचा असून माथा ते पायथा या तत्त्वावर कामे हाती घेण्यात येतात.
  • या प्रादेशिक कार्यालयातील विभागीय कार्यालयांतर्गत जिल्हा जलसंधारण अधिकारी कळवा-ठाणे कार्यालयाकडून ठाणे व पालघर जिल्ह्यात, जिल्हा जलसंधारण अधिकारी रायगड कार्यालयाकडून रायगड जिल्ह्यात आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी रत्नागिरी कार्यालयाकडून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.oयोजना राबविण्यात येत आहे.
  • नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाची (NRM) कामे प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० च्या ४७% टक्के निधीतून करावयाचे आहे.
  • प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० योजने अंतर्गत ठाणे विभागांतर्गत एकूण 09प्रकल्पकार्यान्वीनयंत्रणाअसुन अनुक्रमे ठाणे जिल्ह्यात ०१ व पालघर जिल्ह्यात ०८,रायगड विभागांतर्गत एकुण १० प्रकल्प कार्यान्वीन यंत्रणा व रत्नागिरी विभागांतर्गत एकूण १८ प्रकल्प कार्यान्वीन यंत्रणा असुन रत्नागिरी जिल्ह्यात ९ व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ०९प्रकल्प कार्यान्वीन यंत्रणेचा समावेश आहे.
अ.क्र. तारीख शीर्षक डाउनलोड
२७ एप्रिल २०२२ केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंमलबजावणी करिता केंद्र शासनाच्या मार्गदशगक सूचना २०२१ नुसार
राज्यस्तरीय मान्यता समिती (SLSC) व नोडल यंत्रणा (SLNA) गठीत करणेबाबत.
डाउनलोड
२७ एप्रिल २०२२ केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंमलबजावणी करिता केंद्र शासनाच्या मार्गदशगक सूचना २०२१ नुसार राज्यस्तरीय मान्यता समिती (SLTC) व जिल्हा पाणलोट कक्ष व माहिती कें द्र (WCDC) गठीत करणेबाबत. डाउनलोड
०६ जुलै २०२२ प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना – पाणलोट विकास घटक २.० (PMKSY 2.0) अंतर्गत पाणलोट समिती (WC) स्थापन करणेबाबत. डाउनलोड
GUIDELINES FOR NEW GENERATION WATERSHED DEVELOPMENT PROJECTS (WDC-PMKSY 2.0) डाउनलोड