ठाणे जिल्ह्यात लघु सिंचन योजना राबविण्याच्या दृष्टीने दोन विभागीय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. ० ते १०० हे. सिंचन क्षमता असलेल्या योजनांची कामे जिल्हा जलसंधारण अधिकारी ल.पा. विभाग, जिल्हा परिषद, ठाणे यांच्यामार्फत केली जातात. तसेच, ० ते ६०० हे. सिंचन क्षमता असलेल्या योजनांची कामे जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे यांच्यामार्फत केली जातात.
क्षेत्रीय स्तरावर लघु सिंचनाच्या कामांचे बांधकाम,देखरेख व व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे यांच्या अधिनस्त दोन उपविभागांची अनुक्रमे शहापूर व बदलापूर निर्मिती करण्यात आली आहे. शहापूर उपविभागांतर्गत शहापूर व भिवंडी तालुका व बदलापूर उपविभागांतर्गत अंबरनाथ, मुरबाड व कल्याण तालुक्यांचा समावेश आहे.
तसेच, ठाणे जिल्हा परिषद यंत्रणेअंतर्गत दोन उपविभागांची अनुक्रमे मुरबाड व भिवंडी निर्मिती करण्यात आली आहे. मुरबाड उपविभागांतर्गत मुरबाड व शहापूर तालुका व भिवंडी उपविभागांतर्गत अंबरनाथ, भिवंडी व कल्याण तालुक्यांचा समावेश आहे.