प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे
महाराष्ट्रात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीवर कायम स्वरूपी उपाय योजना करण्याच्या उद्देशाने जलसंधारणाच्या योजना राबविणेसाठी शासनाने ० ते २५० (हे.) पर्यंत सिंचन क्षमता असलेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पाचे बांधकाम व देखभाल व व्यवस्थानाचे काम ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत करण्याचा निर्णय शासन पाटबंधारे विभाग संकीर्ण १०९२ (२८३/९२) आ (क्षेप्र) दिं. ३० सप्टेंबर १९९२ अन्वये घेण्यात आला. शासन निर्णय दिनांक ३१/०५/२०१७ अन्वये मृद व जलसंधारण विभागाची नव्याने स्थापना करण्यात आलेली आहे. मृद व जलसंधारणच्या कार्यक्षेत्रात २५० (हे.) पेक्षा जास्त वाढवून ६०० हेक्टर इतके करण्यात आलेले आहे.
त्यानुसार या मंडळांतर्गत ० ते १०० (हे.) ची कामे जिल्हापरिषदे मार्फत राबविण्यात येतात. जिल्हा परिषदांना तांत्रिक मार्गदर्शन करणे व १ कोटी पेक्षा जास्त किंमत असलेल्या अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देण्याचे काम लघु सिंचन (जलसंधारण) मंडळामार्फत करण्यात येते. या मंडळांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजना, पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, वळवणी बंधारे, काँक्रीट बंधारे, पक्के बंधारे, भूमीगत बंधारे, साठवण बंधारे व गांव तलाव इं. कामे करण्यात येतात. तसेच जलयुक्त शिवार योजना, नदी पुनर्जीवन योजना व गाळयुक्त शिवार या शासनाच्या योजना राबविण्यात येतात.